Wikipedia

Search results

Wednesday 10 April 2013

छत्रपती शिवाजी टर्मिनस CST

 CST
छत्रपती शिवाजी टर्मिनस, भूतकालीन नाव व्हिक्टोरिया टर्मिनस, हे मुंबईतील एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक, युनेस्को जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेल्या हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.
                  मुंबईची स्थापत्यकलादृष्टया सर्वोत्कृष्ट कृती विश्वमान्य आहे. ती म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस. या इमारतीची रचना एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स यांनी केली व ती १८७८ मध्ये पूर्ण झाली. प्युगीन, बर्जेस, बटरफील्ड, स्कॉट, स्ट्रीट यासारख्या त्या कालखंडातील महान ब्रिटिश स्थापत्यविशारदांच्या परंपरेत बसणारी ही निर्मिती होती. समप्रमाणबद्ध असलेल्या या इमारतीची रचना एका उत्तुंग चिरेबंदी घुमटात उत्कर्ष पावते. संपूर्ण इमारत स्थानिक गॉथिक अलंकरणाने व तपशिलाने सजवलेली असून भारतीय गवंड्यांनी प्रशंसनीय रीतीने ही कामगिरी पार पाडली आहे.
त्याने केलेल्या गोपुरांच्या व घुमटांच्या रचनेमुळे त्या त्रिकोणी कोपऱ्याच्या जागेचा पुरेपूर व यशस्वी वापर झालेला दिसतो. या आव्हानपूर्ण आणि जाणकारीच्या कामासाठी करण्यात आलेली एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्सची नियुक्ती किती अचूक होती हे त्यावरून दिसते. टर्मिनसच्या छतावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा असून राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीच्या स्मरणार्थ याचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते.
                 आजच्या काळात अशी बिल्डींग बांधायची तर दूर राहून द्यात पण अहो आम्हाला धड तिचा मेंटेनन्स सुद्धा सांभाळता येत नाही,अन तुम्ही काय विचारताय?" हि बिल्डींग बांधावयाच्या वेळी वीज अजून आलेली नव्हती त्या मुळे आत्ताच्या मेट्रो सिनेमा पर्यंत मातीचा रँप (भराव)तयार केला गेला होता,सदरहू ईमारत बांधते वेळी तेथ पासून ते मोठ मोठाले दगड त्या भरावावरून मजुरा करवी ढकलत आणून हि उंच ईमारत उभी करण्यात आली होती नि जस जसे बांधकाम पूर्ण होत जाईल तसं तसे ते बुजवून टाकावे लागत असे केल्यानेच कोणतीही प्रचलित काळातील मशिनरी नसताना सुद्धा इतक्या उंच इमारती,देवळे त्या काळी बांधली गेली आहेत.बांधकाम पूर्ण झाल्यावर तो मातीचा भराव काढून टाकल्या वर ती संपूर्ण ईमारत देऊळ नजरेस पडत असे.थोडक्यात म्हणजे कोणत्याही अगदी बारीक चुकीला सुद्धा त्या काळी पुन्हा ईमारत बांधते वेळीच वाव रहात नसे.
                       त्याने केलेल्या गोपुरांच्या व घुमटांच्या रचनेमुळे त्या त्रिकोणी कोपऱ्याच्या जागेचा पुरेपूर व यशस्वी वापर झालेला दिसतो. या आव्हानपूर्ण आणि जाणकारीच्या कामासाठी करण्यात आलेली एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्सची नियुक्ती किती अचूक होती हे त्यावरून दिसते.
                                 भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले. ‘हार्बर लाईन’ हा रेल्वे मार्ग वाहतुकीस १९१५ मध्ये खुला करण्यात आला. शहरातील अंतर्गत लोकल रेल्वे सेवा १८७० मध्ये सुरू करण्यात आली. कल्याण - छत्रपती शिवाजी टर्मिनस; कर्जत कसारा - छत्रपती शिवाजी टर्मिनस (मध्य रेल्वे) आणि डहाणू, विरार - चर्चगेट (पश्र्चिम रेल्वे) या मार्गांवर अव्याहतपणे स्थानिक रेल्वे सेवा चालू आहे.
                     ही दुमजली इमारत १८८८ मध्ये बांधण्यात आली असून मध्य रेल्वेचे सर्व प्रशासकीय काम येथूनच केले जाते. मुंबईतील ट्रॅम सेवा इंग्रजांनी सुरू केली असून १८६४ मध्ये ६-८ घोड्यांच्या साहाय्याने परेल-कुलाबा या मार्गावर पहिली ट्रॅम धावली. दि. ७ मे १९०७ रोजी बेस्टने BEST Undertaking बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग विजेवर चालणारी ट्रॅम सेवा मुंबईत सुरू केली, तर शेवटची ट्रॅम व्ही .टी. ते दादर या मार्गावर ३१ मार्च, १९६४ रोजी धावली.
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवतात. उपनगरी रेल्वेने मुंबईत ६९ लाखहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणार्‍या शहरी रेल्वे प्रणाल्यांपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणार्‍या गाड्यांना लोकल ट्रेन किंवा फक्त लोकल असे म्हणतात.
                भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेनची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.
मध्य रेल्वेची सेवा छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून उत्तरेकडे कल्याणपर्यंत (५४ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत कसारा (६७ कि.मी.) किंवा आग्नेय दिशेत खोपोलीपर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा छ.शि.ट. ते कुर्ला व ठाणे ते दिवाच्यादर्म्यान ४ लोहमार्गां, तसेच कुर्ला ते ठाणे व दिवा ते कल्याणच्या दर्म्यान ६ लोहमार्ग धावतात.
                   मुंबईकडे जाताना प्रवासाच्या सर्वात शेवटी येणारे मध्य रेल्वेवरील स्थानक. इथूनच केरळ, तामिळनाडू, आसाम-बंगाल व जम्मू-काश्मीरकडे जाणार्‍या गाड्या सुटतात.
                 मुबंईच्या रोजच्या व्यवहारात ह्या स्टेशनाला खुप महत्व आहे.हे स्टेशन बंद झाले म्हणजे मुबंई बंद झालीच समजा.लगेच सगळे व्यवहार ठप्प होतात.  राजकारणी मुबंईचा बंदची घोषणा केल्यावर ते यशस्वी करण्यासाठी स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात असतात. ह्या स्टेशनातून देशाच्या कानाकोप-यात गाड्या सुटतात  व येथे येतात.   मुबंईतून   कसारा,  कर्जत   व पनवेल   पर्यत लोकल गाड्या   दिवस रात्र पळत असतात. लाखो प्रवाशी रोज या स्टेशनाचा वापर करतात. देशातले सर्वात गर्दीचे हे स्टेशन असेल.पण येथे सर्व शिस्तीत सुरु असते.स्टेशन नेहमीच घावत असते.थाबंते तेव्हा ते बंद असते.हे एक प्रेक्षणिय स्थळ आहे.परदेशी पाहुणे नेहमीच या स्टेशनात फोटो काढताना दिसतात.
                'रोज लाखो प्रवाशांना पोटाशी धरणारे स्टेशन' एवढीच मुंबईच्या सीएसटीची ओळख नाही; अप्रतिम कलाकुसर असलेली गॉथिक शैलीतील भव्यदिव्य वास्तू, ही तिची आणखी एक मोलाची ओळख. या ओळखीला आणखी झळाळी मिळावी, यासाठी केंद सरकारच्या अर्थसाह्यातून या इमारतीवर नवी रोषणाई करण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे तिचे सौंदर्य व्दिगुणित होणार आहे.
               छत्रपती शिवाजी टमिर्नसची वास्तू युनेस्कोच्या र्वल्ड हेरिटेज कमिटीने 'र्वल्ड हेरिटेज' असल्याचे २ जुलै २००४ रोजी जाहीर केले. ही वास्तू पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक नेहमीच येत असतात. या वास्तूचे सौंदर्य अधिक खुलावे यासाठी केंदीय पर्यटन मंत्रालयाने पावले उचलली आहेत. 'सिस्टीम डेस्टिनेशन प्रोजेक्ट'खाली या इमारतीवर विशेष रोषणाई (थिमटिक लायटिंग) करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाकरिता तीन कोटी ८८ लाख रुपये केंद सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. मार्च २०११ पर्यंत ही रक्कम खर्च करून नवी प्रकाशयोजना करण्यात येईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. सी. चौहान यांनी सांगितले. राजस्थानमधील काही ऐतिहासिक वास्तूंवर ही नवी प्रकाशयोजना केली आहे.

No comments:

Post a Comment